सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे भरती मुलाखतींबाबत आज ओरोस येथे तातडीची बैठक

शेअर करा

सिंधुदुर्ग,दि. १२ जून

कोकण रेल्वे संघर्ष व समन्वय समितीची तातडीची बैठक आज, दि. 12 जून 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता शासकीय विश्रामगृह, ओरोस येथे आयोजित करण्यात आली आहे. कोकण रेल्वेच्या भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांच्या मुलाखती विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

कोकणातील बेरोजगार युवकांना मुलाखतीसाठी इतक्या दूर प्रवास करावा लागत असल्याने निर्माण झालेल्या अडचणी, त्यावरील उपाययोजना तसेच यासंदर्भात पुढील भूमिका निश्चित करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. बैठकीत विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेत पुढील आंदोलनात्मक व संघटनात्मक निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर यांनी सर्व पदाधिकारी व सदस्यांना वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कोकण रेल्वे भरती प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांच्या हिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी सर्वांनी या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

शेअर करा