१ ऑक्टोबरला बेंगळुरूहून सुटणार; ४ ऑक्टोबरला मडगावहून परतीचा प्रवास
सिंधुदुर्ग,दि.२८ सप्टेंबर
विकेंडच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने बेंगळुरू कॅन्टोन्मेंट ते मडगाव जंक्शन दरम्यान विशेष एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्रेन क्रमांक ०६५९७ बेंगळुरू कॅन्टोन्मेंट-मडगाव एक्स्प्रेस स्पेशल ही १ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५० वाजता बेंगळुरू कॅन्टोन्मेंट येथून सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.१० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक ०६५९८ मडगाव-बेंगळुरू कॅन्टोन्मेंट एक्स्प्रेस स्पेशल ही ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.४० वाजता मडगावहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता बेंगळुरू कॅन्टोन्मेंट येथे पोहोचेल.
या विशेष गाडीला एस.एम.व्ही.टी. बेंगळुरू, चिकबाणावर, कुनिगल, चन्नरायपटणा, हासन, सकलेशपूर, सुब्रह्मण्य रोड, काबकापुत्तूर, बंटवाल, सुरतकल, मुल्की, उडुपी, बारकूर, कुंदापूर, मूकांबिका रोड बायंदूर, भटकळ, मुरुडेश्वर, होन्नावर, कुमटा, गोकर्ण रोड, अंकोला, कारवार आणि काणकोण या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.
या गाडीला एकूण २३ डबे असून त्यामध्ये १ एसी टू टियर, ३ एसी थ्री टियर, १० स्लीपर, ७ जनरल आणि २ एसएलआर/डी डबे असतील.
ट्रेन क्रमांक ०६५९८ साठीचे आरक्षण ३० सप्टेंबर २०२६पासून सर्व प्रवासी आरक्षण केंद्रे (PRS), इंटरनेट तसेच IRCTC संकेतस्थळावर सुरू होणार आहे.
विकेंडच्या सुट्टीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.