नेतृत्व, दातृत्व, आणि कर्तृत्वाची त्रिवेणी – सच्चिदानंद उर्फ संजू परब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मडुरा सारख्या ग्रामीण भागात जन्म घेतलेल्या आणि आपल्या कर्तृत्वाने राजकारण आणि समाजकारणात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचा सोमवार, १९ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे.
मडुरासारख्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले संजू परब यांनी गेल्या २६ वर्षांत आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून ओळख निर्माण केली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख ते माजी नगराध्यक्ष असा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.


एक सामान्य कुटुंबातून दमदार नेतृत्व
संजू परब यांचा राजकीय प्रवास शिवसेना शाखाप्रमुख म्हणून सुरू झाला आणि त्यानंतर सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भूषवून त्यांनी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली.या दरम्यान राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रवास,पदाना त्यांनी न्याय दिला.त्यांच्या सडेतोड बोलण्यामुळे त्यांनी अनेकदा विरोधकांना अंगावर घेतले, तर नगराध्यक्ष म्हणून प्रशासकीय कामातही त्यांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली. त्यांच्या याच गुणांमुळे त्यांनी केवळ सावंतवाडीतच नाही, तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वात, दातृत्वात आणि कर्तृत्वात मेहनतीची जोड दिसून येते.


लोकांच्या सुख-दुःखातील ‘हक्काचा संजू’
संजू परब यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा जनसंपर्क. सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यात गेली २६ वर्षे ते लोकांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असतात. कोणत्याही परिस्थितीत, मग ते सुख असो वा दुःख, संजू परब नेहमी धावून जातात. यामुळेच कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता त्यांना ‘आमचा हक्काचा संजू’ म्हणून ओळखतात. त्यांच्या शिवसेना जिल्हाप्रमुख,नगराध्यक्षपदाच्या काळात त्यांनी केलेली जनसेवा पाहूनच, जनता त्यांच्याकडे भावी आमदार म्हणून पाहत आहे. ‘संजू आमचो आमदार’ ही त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि चाहत्यांची इच्छा आहे.



संकटकाळातील मदत आणि दानशूरता;
नगराध्यक्षपदावर असताना आलेल्या कोरोना महामारीच्या संकटात संजू परब यांनी जीवावर उदार होऊन काम केले. घरात न बसता ते रस्त्यावर उतरले आणि गरीब कुटुंबांना धान्य वाटप केले. तसेच, क्वारंटाईन हॉस्पिटलसाठी २०० बेड उपलब्ध करून दिले. या कृतीतून त्यांनी हे सिद्ध केले की राजकारण करण्यासोबतच समाजकारण करणे हा त्यांचा मूळ वसा आहे. या दानशूरपणामुळेच त्यांच्या राजकीय विरोधकांनाही त्यांच्याबद्दल नेहमीच आदर वाटतो.

राजकीय गुरू आणि कुटुंबाची साथ:
संजू परब यांना राजकारणात माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांचे मार्गदर्शन लाभले. राणे साहेबांनी दिलेली कोणतीही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. माजी खासदार व विद्यमान आमदार निलेश राणे यांच्याशीही त्यांचे दृढ संबंध आहेत. मैत्री जपण्याची एक अनोखी हातोटी त्यांच्याकडे आहे, ज्यामुळे त्यांनी अनेक जीवाला जीव देणारी माणसे जोडली आहेत. त्यांच्या या यशस्वी प्रवासात त्यांची पत्नी सौ. मिनल, मुली वैष्णवी आणि सई, आणि त्यांच्या दिवंगत आई-वडिलांची साथ मोलाची ठरली आहे.
सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून ते सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यात संघटना बांधणीचे काम प्रभावीपणे करत आहेत. त्यांच्या कामाची दखल खुद्द शिवसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे हेही त्यांच्या कामाला पाठिंबा देत असतात.
अशा या कार्यतत्पर आणि कर्तव्यदक्ष नेतृत्वाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

….. संजू परब आमदार होतील!
संजू परब यांनी पक्ष आणि प्रशासकीय कामकाजावर ठसा उमटवला आहे त्यामुळे ते जनतेच्या मनातील आमदार म्हणून ओळखले जातात. आमदार दीपक केसरकर यांच्या आशीर्वादाने ते आमदार होतील असा विश्वास शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा अँड निता कविटकर, व मान्यवर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यातील गावोगावी ते पोहोचले आहेत. खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांचे आशीर्वाद त्यांच्या मागे आहेत.
संजू संवेदनशील शिवसैनिक – उदय सामंत!
राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी सामंत यांनी परब यांच्या कामाचे कौतुक केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे काम करत असताना संजू परब हे आमदार दीपक केसरकर,आमदार निलेश राणे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून शिवसेनेचे काम अतिशय जोमाने करत आहेत, असे उदय सामंत म्हणाले. परब यांची ओळख एक संवेदनशील शिवसैनिक म्हणून आहे.
बाळासाहेबांच्या विचारांचे अनुसरण
सामंत यांनी परब यांचे कौतुक करताना सांगितले की, ते बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या संदेशाचे तंतोतंत पालन करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. या कामासाठी ते मनापासून त्यांचे कौतुक करत आहेत.

शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचेही लक्ष;
महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुखांच्या कामाकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जातीने लक्ष असून, ते संजू परब यांच्या कामावर खूश असल्याचे सामंत यांनी नमूद केले. परब यांनी शिवसेनेचे व्रत घेतले असून, शिवसेना वाढवण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या या कार्याला सामंत यांनी शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसानिमित्त परब यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत, अशी प्रार्थना करून सामंत यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त व राजकीय भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
संजू वाघासारखे काम करणारे – केसरकर!
माजी शिक्षण मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, संजू परब हे एक उमदे आणि वाघासारखे काम करणारे नेतृत्व आहे. त्यांनी म्हटले की, राजकारणात कधीकधी जवळची माणसे दूर जातात आणि दूरची माणसे जवळ येतात. संजू परब यांच्या बाबतीतही असेच काहीसे घडले, पण आता ते पुन्हा माझ्यासोबत आले आहेत.
केसरकर यांनी सांगितले की, संजू परब यांचे वडील ‘अण्णा’ माझ्या सोबत राष्ट्रवादीमध्ये असताना काम करत होते आणि त्यांचे नेहमीच प्रेम आणि पाठिंबा मला मिळाला. त्यामुळे संजू आणि माझ्या कुटुंबासोबत त्यांचे जुने स्नेहसंबंध आहेत.

केसरकर म्हणाले की, संजू परब नगरपरिषद निवडणुकीत विजयी झाले. नगराध्यक्ष म्हणून त्यांनी नगरपरिषदेचा कारभार चांगला सांभाळला. यावेळी केसरकर यांनी सांगितले की, जर संजू परब आधीच माझ्या सोबत आले असते, तर त्यांनी राजकारणात मोठी आघाडी घेतली असती. युवकांमध्ये लोकप्रिय असलेले दमदार युवा नेतृत्व म्हणून संबोधले. ते म्हणाले की, संजू परब आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रामाणिकपणे काम करत आहेत.

केसरकर यांनी आठवण करून दिली की, संजू परब यांनी खासदार नारायण राणे यांच्यासोबत असताना पंचायत समितीमध्ये विजय मिळवला होता आणि आपले राजकीय कौशल्य दाखवून निवडणूक जिंकली होती. आता ते युतीचा सन्मान राखून काम करत आहेत आणि कार्यकर्त्यांना पाठबळ देत आहेत. संजू परब यांनी नगराध्यक्ष असताना अनेक चांगली कामे केली. शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून संजू परब हे सर्व शिवसैनिकांसोबत मिळून काम करत आहेत. सर्वजण एकत्रितपणे विकासाचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी झटत आहेत.
ते म्हणाले की, संजू परब हे माझ्या जवळच्या दोन-तीन सहकाऱ्यांपैकी अग्रस्थानी आहेत आणि यशस्वी वाटचालीत ते नेहमी अग्रस्थानी राहतील. त्यांनी संजू परब यांना संयमाने काम करत राहण्याचा सल्ला दिला आणि एक दमदार नेतृत्व म्हणून पुढे येण्यासाठी शुभेच्छा दिल्या. शेवटी, केसरकर यांनी संजू परब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.


संजू आमच्या कुटुंबातील एक सदस्य: आमदार निलेश राणे!
माजी खासदार आणि विद्यमान आमदार निलेश राणे म्हणाले,संजू परब हे आमच्या कुटुंबातील एक सदस्य असून, संजू परब यांनी सदैव राणे साहेबांनी घेतलेल्या प्रत्येक राजकीय निर्णयाचा सन्मान करून त्याप्रमाणे कृती केली. सावंतवाडी नगराध्यक्ष असताना संजू परब यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत सावंतवाडी शहराच्या विकासासाठी अनेक चांगले निर्णय घेतले, प्रशासन व्यवस्थितरित्या चालविले. माझ्या भावाप्रमाणे नेहमी माझ्या सोबत असणाऱ्या संजू परब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
