कणकवली,दि.०३ ऑक्टोंबर
सिंधुदुर्ग जिल्ह््यात यंदा पाऊस कमी झाल्यामुळे जिल्ह््याला पाणी टंचाईची झळ बसणार आहे. ही झळ टाळण्यासाठी जलसंधारण व लघू पाट बंधारे विभागाने नदीपात्रात असलेल्या छोट्या व मोठ्या बंधाऱ्यावर प्लेट्स घालताना लिंकेज होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभाप्रमुख, युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाने केवळ जलसंधारणाची कामाच्या शुभारंभाचे फोटो सेशन न करता जलसंधारणाची कामे दर्जेदार होण्याकडे लक्ष द्यावे, असा टोला नाईक यांनी लगावला.
सुशांत नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, गत वर्षी जलसंधारण व लघू पाट बांधारे विभागाने नदीपात्रात पाणी अडविण्यासाठी प्लेट्स घातल्या. मात्र, प्लेट्स काम चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे लिकेज झाल्याने नदीपात्रात पाणीसाठा झाला नाही. परिणामी नदीपात्रालगतच्या गावांना उन्हाळी हंगामात पाणी टंचाईची झळ बसली. ही परिस्थिती यंदा उद्भवू नये याकरिता नदीपात्रातील बंधाऱ्यांमध्ये प्लेट्स घातलाना त्यातून पाणी वाहून जाणार याची दक्षता घ्यावी, अशी मागणी सुशांत नाईक यांनी केली आहे.
नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह््यातील नदीतील गाळ काढण्याचे कामे करताना कोंडीचे सापटीकरण करण्यात आले. परिणामी कोंडीमध्ये पाणीसाठा झाला नाही, असा आरोप नाईक यांनी केला. सिंधुदुर्ग जिल्ह््यात संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन केल्या आणि बंधाऱ्यांमध्ये साठा होणारे पाणी प्लेट्सद्वारे लिंकेज होणार नाही, याची दक्षता घेतल्यास पाणी टंचाई संकट टाळता येईल, असा दावा सुशांत नाईक यांनी केला.