ओझरम शाळेतील गरीब विद्यार्थ्यांसाठी एक लाखांची अन्नधान्य मदत

शेअर करा

बी. एस. सावंत यांच्यातर्फे देणगी; निवासी संकुलातील विद्यार्थ्यांना मिळणार मोठा आधार

तळेरे,दि.२३ ऑगस्ट

 ओझरम येथील जितेंद्र राणे यांच्या माध्यमातून बी एस सावंत - ट्रस्टी - बँक ऑफ हैदराबाद स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्ट यांनी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओझरम नं. १ येथील निवासी संकुलात राहून शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी आवश्यक अन्नधान्याकरिता एक लाख रुपयांची देणगी दिली.

    यानिमित्ताने शाळा ओझरम नं. १ येथे ग्रामस्थांच्या वतीने बी.एस. सावंत यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बी एस सावंत यांनी यापूर्वी ओझरम नं. १ शाळेला दहा बेंच व एक कपाट असे  साहित्य मागील शैक्षणिक वर्षात देणगी स्वरूपात दिले होते. 
 यावेळी बी. एस. सावंत म्हणाले आम्ही तुम्हा विद्यार्थ्यांसाठी काहीही कमी पडू देणार नाही. तुम्ही फक्त गुरूजनांकडून उत्तम शिक्षण घेऊन जीवनात यशस्वी व्हा आणि खूप मोठे व्हा. 

तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई म्हणाले मराठी शाळांची पटसंख्या कमी होत चाललेली असताना शाळा ओझरम नं.१ मधील सातत्याने वाढणारे पटसंख्या ही गोष्ट कौतुकास्पद बाब आहे. याकरीता मी ओझरम ग्रामस्थांना, ओझरम सेवा मंडळ मुंबई, निवासी संकुल दक्षता समिती व मुख्याध्यापक - शिक्षकवर्ग यांना त्यांच्या कार्यासाठी धन्यवाद देतो व या शाळेसाठी माझे नेहमीच सहकार्य राहील. 

तसेच जितेंद्र राणे यांचे शाळेसाठी नेहमीच भरीव योगदान असल्याने त्यांचाही सरपंचांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी बी. एस. सावंत यांचे शाळेविषयी असलेले योगदान याबाबत विचार व्यक्त केले .तसेच यावेळी विनायक राणे यांनी शाळेची वाटचाल व करीत असलेल्या कार्याविषयी माहिती दिली .कासार्डे केंद्राचे केंद्रप्रमुख नितीन पाटील यांनीही या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन बी. एस. सावंत यांच्या दातृत्वाबद्दल आभार मानले व शाळेबद्दल गौरव उदगार काढले.


या कार्यक्रमाला ओझरम गावचे सरपंच सौ. समृद्धी राणे, कासार्डे उपसरपंच गणेश पाताडे, पंचायत समिती कणकवलीचे माजी सभापती विनायक राणे, निवासी संकुल दक्षता समितीचे अध्यक्ष एल. डी. राणे, तंटामुक्ती समिती ओझरमचे अध्यक्ष सदाशिव उर्फ बाबू राणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश राणे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष बंडू राणे, उपाध्यक्षा सौ. सानवी सुरेश खरात, गावचे पोलिस पाटील तुषार तांबे, निवासी संकुल दक्षता समिती सदस्य रामचंद्र बिर्जे, भाई दळवी, अरविंद राणे, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर राणे, कासार्डे ग्रामपंचायत सदस्य अतुल सावंत, माजी सैनिक वसंत राणे, सुहास राणे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ. अपर्णा राणे, सौ. ज्योती बिर्जे, सौ.दिव्या राणे, सागर होळकर, उत्तम घाटगे, पांडूरंग झोरे, शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच यावेळी सौ. प्राची प्रकाश दळवी यांच्या माध्यमातून सरस्वती एज्युकेशन सोसायटी दादर मुंबई या संस्थेच्या वतीने ओझरम नं. १ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वीस हजार रुपये किंमतीचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री . विनायक जाधव यांनी केले तर आभार श्रीम. शालिनी तांबे यांनी मानले.

शेअर करा