तळेरे : पियाळीत भजनी व महिला फुगडी मंडळांना साहित्य वाटप

शेअर करा

संतोष कानडे यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायतीचा उपक्रम; सर्व भजनी मंडळांना साहित्याचे वितरण

तळेरे,दि.१२ सप्टेंबर

सिंधुदुर्ग भजनी कलाकार संस्था अध्यक्ष व कलाकार मानधन समिती सिंधुदुर्ग सदस्य श्री संतोष कानडे यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत पियाळी यांच्या वतीने पियाळी गावातील सर्व भजनी मंडळ भजनी व महिला फूगडी मंडळाना भजनी व फुगडीसाठी उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.


यावेळी भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग अध्यक्ष व कलाकार मानधन समितीचे सिंधुदुर्ग सदस्य संतोष कानडे, पियाळी ग्रामपंचायत सरपंच प्रवीण पन्हाळकर, उपसरपंच विजय मुरकर, ग्रामपंचायत सदस्य संजय ढवण, सौ.तन्वी गुरव, सौ. अपर्णा कावले, माजी सरपंच व तंटामुक्ती समिती पियाळी अध्यक्ष दामोदर नारकर, माजी उपसरपंच बाळा करमळकर, कासार्डे पियाळी विकास सोसायटी व्हाईस चेअरमन बाबू घाडी, वाडी प्रमुख शरद नारकर, चंद्रकांत वंजारे, यशवंत तेली, संदीप मुरकर तसेच गावातील सर्व भजनीबुवा व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.


यावेळी भजनी तसेच फुगडी मंडळांनी समाधान व्यक्त करत गणपतीच्या काळात या साहित्याची खुप गरज होती. ग्रामपंचायत पियाळी व संतोष कानडे यांनी गरज ओळखून दिलेले साहित्य आमच्या मंडळांसाठी नक्कीच प्रेरणादायी व कलेला प्रोत्साहन देणारे आहे.

फोटो :- ग्रामपंचायत पियाळी येथे भजनी व फुगडी मंडळांना साहित्य वाटप करताना संतोष कानडे, सरपंच प्रवीण पन्हाळकर व इतर मान्यवर

शेअर करा