तळेरे : बहारदार प्रात्यक्षिकांनी कासार्डे माध्य. विद्यालयात ‘जागतिक योग दिन उत्साहात साजरा

शेअर करा

तळेरे,दि. २२ जून

कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध योगासने व प्राणायामाची मनमोहक आणि बहारदार प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली,यामध्ये इयत्ता पाचवी मधील कु.स्पृहा कल्याणकर,स्वर्नील गिरी,कु.गुंजन पांचाळ,कु.शिवन्या पाताडे यांनी तर सहावीतील कु.आराध्या आडिवरेकर,
कु.स्वरा घोळवे,कु.वैभवी कल्याणकर,
कु.कृतिका पाताडे,कु.आरोही नकाशे,कु. कृपा मुद्राळे,,कु. विराज राणे,,कु.स्वरा देसाई,
परमवर्धन सुतार,प्रसाद पांचाळ, चैतन्य जाधव,मंदार जाधव यांनी तर इयत्ता सातवीतील कु. स्वरा गिरी,कु. जान्हवी खरात,कु.दिव्या देसाई,,विराज पवार, आयान बागेवाडी, इयत्ता आठवीतील गौरव राठोड, इयत्ता नववीच्या ध्रूव शेट्ये आदींचा सहभाग होता.ही प्रात्यक्षिके योगा मार्गदर्शक प्रियंका सुतार व क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केली.
या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्या बी.बी.बिसुरे आदी मान्यवर उपस्थित .
जागतीक योग दिनाला प्रशालेतील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत योग दिन उत्हातसाजरा केला.

शेअर करा