तळेरे : जीवन प्रबोधिनी ट्रस्ट मुंबईतर्फे पोयरे गावात, देवगड शैक्षणिक साहित्य वितरण

शेअर करा

तळेरे , दि. ०७ जुलै

जीवन प्रबोधिनी ट्रस्ट, मुंबईचे संस्थापक सत्यवान नर यांची महत्त्वाकांक्षी संकल्पना ‘निश्चय शैक्षणिक क्रांतीचा, निश्चय महाराष्ट्र घडविण्याचा’ या अंतर्गत
देवगड तालुक्यातील पोयरे गावातील गादववाडी, मशवी व गावठणवाडी या तिन्ही प्राथमिक शाळांना जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे संयोजक केशव परब यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य शाळा पोयरे मशवी येथे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उदगिरे सर यांनी केले. याप्रसंगी उपस्थित उद्योजक दत्तप्रसाद वळंजू, केंद्रप्रमुख उदगीरे सर, बागडे सर, कदम सर, पाटील मॅडम, सौ.नेहा माटवकर, नंदकुमार माटकर, सौ.नीलम जाधव आदी ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा