तळेरे: कणकवली तालुक्यातील तेली समाजातर्फे २६ जुलै रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा

शेअर करा

तळेरे,दि.१२ जुलै

कणकवली तालुक्यातील तेली समाज बांधवांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवार, २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता उत्कर्षा हॉटेल, कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात इयत्ता १० वीमध्ये ७५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण, १२ वीमध्ये ७० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण, पदवी परीक्षेत प्रथम श्रेणी, शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी, तसेच विविध क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळविलेले विद्यार्थी व समाजबांधव यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
पात्र विद्यार्थ्यांनी अथवा त्यांच्या पालकांनी विद्यार्थ्याचे नाव व गुणपत्रिकेची प्रत २० जुलैपर्यंत खालील प्रतिनिधींकडे व्हॉट्सअॅपद्वारे किंवा प्रत्यक्ष जमा करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संपर्क :
महेश नंदकिशोर डिचोलकर – 7387362202
विशाल कुशाजी नेरकर – 9403228842
राधिका नंदकुमार आरोलकर – 9890294114
अरविंद स. वायंगणकर – 9011287087
कणकवली तालुक्यातील पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आवश्यक माहिती वेळेत सादर करावी, असे आवाहन तेली समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा