तळेरे : साळीस्ते महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी करूणा गुरव यांची निवड : प्रथमच महिला अध्यक्षपदी निवड

शेअर करा

तळेरे,दि.११ सप्टेंबर
कणकवली तालुक्यातील साळीस्ते गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी करुणा रत्नाकर गुरव यांची निवड करण्यात आली आहे. प्रथमच गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी महिला अध्यक्षपदी निवड झाली असून निवडीनंतर त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी साळीस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर, उपसरपंच जितेंद्र गुरव, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी राजश्री पेडणेकर जाधव, पोलिस पाटील गोपाल चव्हाण, माजी सरपंच राधाबाई गुरव, चंद्रकांत हरयाण, मंगेश कांबळे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी प्रथमच महिला अध्यक्ष यांची निवड झाली असून या निवडीनंतर प्रतिक्रिया देताना करुणा गुरव म्हणाल्या की, गावाने दिलेली जबाबदारी तेवढ्याच प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने तटस्थपणे पेलण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि प्रत्येकाला न्याय मिळेल असेच काम करण्याचा प्रयत्न असेल.

शेअर करा