तळेरे : कासार्डे विद्यालयाच्या कुस्तीपटूंचे घवघवीत यश

शेअर करा


तब्बल २४ कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

तळेरे

क्रीडा विभाग सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित कणकवली तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डेच्या कुस्तीपटूंनी दमदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत विद्यालयाच्या तब्बल २४ कुस्तीपटूंनी प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. जिल्हास्तरीय स्पर्धा ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहे.
तालुकास्तरीय स्पर्धेतील यशस्वी कुस्तीपटू
१४ वर्षांखालील मुलांचा गट :
५७ कि.ग्रॅ. वजनगटात — भावेश शिवानंद नारकर -प्रथम, श्रेयान नंदकिशोर सावंत- द्वितीय.
६२ कि.ग्रॅ. वजनगटात — आयन तौफिक बागेवाडी -प्रथम, अभिषेक देवेंद्र देवरुखकर -द्वितीय.-६८ कि.ग्रॅ. वजनगटात — अद्वेत हनुमंत गीते -प्रथम.-७५ कि.ग्रॅ. वजनगटात — पृथ्वीराज शिवानंद राठोड -प्रथम.
१४ वर्षांखालील मुलींचा गट :
३० कि.ग्रॅ. वजनगटात — श्रावणी राजेंद्र कोकरे -प्रथम.३६ कि.ग्रॅ. वजनगटात — प्रीती शिवराज क्षीरसागर- प्रथम,भूमी गौरव पंडित -द्वितीय.
३९ कि.ग्रॅ. वजनगटात — साक्षी बंडू कोकरे- प्रथम.४२ कि.ग्रॅ. वजनगटात — समृद्धी मनोहर मराठे- प्रथम, स्वरा नारायण झोरे -द्वितीय.
५० कि.ग्रॅ. वजनगटात — दक्षा संतोष राऊत -प्रथम.
१७ वर्षांखालील मुलांचा गट :
ग्रिको रोमन स्टाईल कुस्ती :
४५ कि.ग्रॅ. वजनगटात — ध्रुव अभिजीत शेट्टी -प्रथम.
फ्रीस्टाईल कुस्ती :
४५ कि.ग्रॅ. वजनगटात — आदर्श दीपक जाधव -द्वितीय,हर्षल योगेश कदम -तृतीय.
४८ कि.ग्रॅ. वजनगटात — प्रथमेश सत्यवान तेली -प्रथम, ओम मंगेश राणे -द्वितीय.
८० कि.ग्रॅ. वजनगटात — तेजस तानाजी राठोड -प्रथम.
११० कि.ग्रॅ. वजनगटात — आराध्य प्रवीण तळेकर- प्रथम.
१७ वर्षांखालील मुलींचा गट :
४० कि.ग्रॅ. वजनगटात — धैर्या अरविंद परब -प्रथम, कनिष्का गोविंद कोकरे -द्वितीय.
५३ कि.ग्रॅ. वजनगटात — सावरी अतुल ब्रह्मदंडे -प्रथम.६९ कि.ग्रॅ. वजनगटात — अस्मि प्रदीप ठुकरुल -प्रथम.
१९ वर्षांखालील मुलांचा गट — फ्रीस्टाईल कुस्ती :
५७ कि.ग्रॅ. वजनगटात — शुभम सुरेश राठोड -तृतीय.७४ कि.ग्रॅ. वजनगटात — किशोर बाबूलाल देवासी -प्रथम.
१९ वर्षांखालील मुलींचा गट :
५० कि.ग्रॅ. वजनगटात — वैदेही मधुसूदन राणे -प्रथम.५५ कि.ग्रॅ. वजनगटात — साक्षी संतोष तेली -प्रथम.६२ कि.ग्रॅ. वजनगटात — आसावरी हर्षकांत तानवडे -प्रथम.६८ कि.ग्रॅ. वजनगटात — नंदिता प्रवीण मतलवार -प्रथम.
१९ वर्षांखालील मुलांचा गट — ग्रिको रोमन स्टाईल कुस्ती :
५५ कि.ग्रॅ. वजनगटात — अमोल दीपक जाधव -प्रथम.६० कि.ग्रॅ. वजनगटात — दुर्वास संजय पवार- प्रथम.९७ कि.ग्रॅ. वजनगटात — विघ्नेश संतोष पेडणेकर -प्रथम.
या यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड, प्रा.देवेंद्र देवरुखकर, प्रशिक्षक अभिजित शेट्ये, साईप्रसाद बिजीतकर,स्वप्निल कदम यांच्यासह क्रीडा विभागातील सर्व शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
कणकवली क्रीडा परिषदचे अध्यक्ष तथा कणकवलीचे तहसीलदार दिक्षांत देशपांडे, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस,कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे सर्व पदाधिकारी,विद्यालयाच्या प्राचार्या सौ. बी. बी. बिसुरे, ज्येष्ठ शिक्षक ए. पी. घुले व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच पालक आणि ग्रामस्थांनीही यशस्वी कुस्तीपटूंचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कासार्डे विद्यालयाच्या कुस्तीपटूंचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

शेअर करा