१४ वर्षांखालील मुलांच्या संघाची जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड
तळेरे,दि.०२ ऑक्टोंबर
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित कणकवली तालुकास्तरीय शालेय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. मुडेश्वर मैदान, कणकवली येथे सलग दोन दिवस झालेल्या या स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग घेतला होता.
कासार्डे विद्यालयाच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखदार प्रवेश केला. १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने उपविजेतेपद, तर कासार्डे ज्युनिअर कॉलेजच्या १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक मिळविला.
१४ वर्षांखालील विजेता संघ आता ओरोस जिल्हा क्रीडा संकुल येथे होणाऱ्या शालेय जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत कणकवली तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
१४ वर्षांखालील संघात- अथर्व सावंत, सत्यविजय गुरव, वेदांत पवार, गौरांग शेलार, सक्षम सावंत, शंतनू कराळे, विघ्नेश तळेकर, सार्थक वायंगणकर, शेखर पाताडे, वृषभ तावडे, विराज पवार, अर्णव तोरस्कर, वशिष्ठ राणे, अभिषेक देवरुखकर व आर्यन दराडे यांचा समावेश आहे.
१७ वर्षांखालील संघात -कर्णधार गंधार मुणगेकर, नितेश गावडे, दक्ष जाधव, कौशिक आलव, यशराज नारकर, चंदन पाताडे, दक्ष पाताडे, मयंक सोमले, श्रीकृष्ण राठोड, वेदांत केसरकर, ध्रुव शेट्ये, लोकेश पांचाळ, सोहम पाताडे व मृणाल मुणगेकर यांनी सहभाग घेतला.
१९ वर्षांखालील संघात- नितेश चोरगे, संकल्प भोगले, परशुराम राठोड, आर्यन कदम, प्रणय पवार, निहार तांबे, दत्तप्रसाद पाताडे, जयदीप लाड, चेतन पवार, हर्षद तोरस्कर, तेजस अहिरे व सोहम गुरव यांचा समावेश होता.
या यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे शिक्षक प्रा.दिवाकर पवार, यशवंत परब व प्रा.स्वप्निल वाळके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाच्या प्राचार्या बी. बी. बिसुरे, ज्येष्ठ शिक्षक ए. पी. घुले, क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजेत्या व गुणवंत खेळाडूंचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.क्रिकेट संघांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.