दर्जेदार शिक्षणासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत; विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यावर सभापती हर्षदा वाळके यांचा भर.
तळेरे,दि.२९ जून
आपल्या गावची शाळा आपला अभिमान असतो. यासाठी आपली शाळा सुसज्ज असावी असे मुलांबरोबर पालकांना वाटते.यामुळे शाळेतील भौतिक सुविधा असण्या बरोबर मुलांची प्रगती महत्त्वाची असते.आजवर मराठी शाळेत विद्यार्थी दर्जेदार घडले आहेत म्हणून यापुढे मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सार्वानी प्रयत्न करुया असे कणकवली सभापती हर्षदा वाळके यांनी सांगितले.त्या जि.प.शाळा कासार्डे,बौध्दवाडीच्या नूतन इमारतीच्या उघ्दाटन प्रसंगी बोलत होत्या.
सभापती सौ. वाळके यांच्या शुभहस्ते फीत कापून वर्गखोल्यांचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी सरपंच निशा नकाशे,जि.प.सदस्य संतोष पारकर,पं.स.सदस्या सहदेव खाडये,माजी जि.प.सदस्य संजय देसाई माजी सभापती प्रकाश पारकर, उपसरपंच गणेश पाताडे,गटशिक्षणाधिकारी किशोर गवस,तंटामुक्ता अध्यक्ष प्रकाश तिर्लोटकर, केंद्रप्रमुख संजय पवार, नितीन पाटील,सिद्धार्थ नारागौड,आनंद कासार्डेकर, ग्रा.पं.सदस्य विजय राणे, आरोही जाधव, मिलिंद पाताडे, अभिजित धुमाळ, पोलिस पाटील योगेश कदम,भाऊ जाधव, संतोष सावंत, अशोक पांचाळ, आप्पा बोभाटे, कमलेश झा,भाई पाटील,हेमंत कांडर,देविदास कदम,उदय कदम, सुशांत पाताडे,सौरभ देसाई, जगदिश गोसावी, अशोक धुरी, विनायक पाताडे,अनिल जमदाडे, काणेकर, केंद्रातील मुख्याध्यापक,शिक्षक,शा.व्य.समिती,माजी विद्यार्थी संघ, शाळा विकास समिती तसेच बौध्दवाडी,दाबवाडी,पावसकरवाडी ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
पुढे संजय देसाई म्हणाले, नवीन शाळेच्या इमारतीतून चांगले विद्यार्थी घडतील यासाठी दर्जेदार शिक्षण झाले पाहिजे.मराठी शाळेतील विद्यार्थी आज कुठेही मागे नाही.तर निशा नकाशे यानी शिक्षण जीवनात महत्त्वाचा टप्प्या आहे.यासाठी सुसज्ज इमारतीतून अनेक विद्यार्थी घडून भविष्यात उच्च पदावर जातील असे सांगितले.संजय पवार,रविंद्र जाधव,प्रकाश तिर्लोटकर,आनंद कासार्डेकर,किशोर गवस,संतोष पारकर,सहदेव खाडये,प्रकाश पारकर यांनी मनोगत व्यक्ता केले.उपस्थित मान्यवरा व ग्रामस्थांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुत्रसंचलन झाकिर शेख व आभार यानी मानले.
फोटो : कासार्डे बौध्दवाडी शाळेच्या नूतन ईमारतीचे उघ्दाटन करताना मान्यवरा व ग्रामस्था