जिल्हास्तरीय स्पर्धेत ९ खेळाडू अव्वल
तळेरे,दि.०२ ऑक्टोंबर
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्या द्वारा आयोजित शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे संपन्न झाली या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कासार्डे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील 11 खेळाडूंनी अभिनंदन यश संपादन केलेले आहे. त्यामध्ये ९ कुस्तीगिरांनी प्रथम क्रमांक तक्ष २ कुस्तीगीरांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे. विजेत्या ९ खेळाडुंची सातारा येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी खेळाडू पुढील प्रमाणे
14 वर्षाखालील मुलांच्या वयोगटात
५७ कि.ग्रॅ. वजनगटात- भावेश नारकर प्रथम,६२ कि.ग्रॅ. वजनगटात- आयान बागेवाडी – द्वितीय,६८ कि.ग्रॅ. वजनगटात- अद्वैत गिते- प्रथम,७५कि.ग्रॅ. वजनगटात- पृथ्वीराज राठोड – प्रथम,
14 वर्षाखालील मुलींच्या गटात
३०कि.ग्रॅ. वजनगटात- कु.श्रावणी कोकरे -प्रथम,
17 वर्षाखालील मुलींच्या गटात
४० कि.ग्रॅ. वजनगटात- धैर्या परब -प्रथम,६९ कि.ग्रॅ. वजनगटात- अस्मी ठुकरूल- प्रथम,
19 वर्षाखालील मुलींच्या गटात-
55 कि.ग्रॅ. वजनगटात- साक्षी तेली-प्रथम
19वर्षाखालील मुलांच्या गटात-
74कि.ग्रॅ. वजनगटात-किशोर देवासी-प्रथम
तर ग्रीको रोमन स्टाईल मध्ये
55 कि.ग्रॅ. वजनगटात- अमोल जाधव प्रथम, 60 कि.ग्रॅ. वजनगटात- दुर्वास पवार-प्रथम आला आहे.
या यशस्वी खेळाडूंना प्रशालेचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड,कोच अभिजित शेट्ये, स्वप्निल कदम, साईप्रसाद बिजीतकर, विद्यालयाचे शिक्षक श्री.धोंड यांचे मार्गदर्शन तर देवेंद्र देवरुखकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
या गुणवंत विद्यार्थ्यांचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाच्या प्राचार्या सौ बी.बी.बिसुरे,जेष्ठ शिक्षक ए.पी.घुले यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अभिनंदन करून कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.