तळेरे : पीएम श्री जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं.१ ची उज्ज्वल कामगिरी

शेअर करा

सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय गुणवत्तायादीत तिन्ही विद्यार्थ्यांचा गौरव

तळेरे,दि.०५ जुलै

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ मध्ये पीएम श्री जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं.१ येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय गुणवत्तायादीत स्थान मिळविले आहे.

शाळेची विद्यार्थिनी कुमारी काव्या सदानंद तळेकर हिने जिल्हा गुणवत्तायादीत दुसरा क्रमांक पटकावून शाळेचा नावलौकिक उंचावला आहे. तसेच कुमार श्रीकृष्ण मंगेश दहिफळे याने जिल्हा गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक मिळविला. ग्रामीण शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत कुमारी माही अजित जोईल हिने १३ वा क्रमांक संपादन केला आहे.

या तिन्ही गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सौ.देवकी तळेकर व सर्व सदस्य, मुख्याध्यापक महेंद्र पावसकर तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

शेअर करा