तळेरे: पीएच.डी. पदवीप्राप्त प्रा. हेमंत महाडिक यांचा सुनील तळेकर ट्रस्ट आणि वाचनालयाकडून सत्कार

शेअर करा

तळेरे,दि.०९ ऑगस्ट

तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक हेमंत सुभाष महाडिक यांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (Ph.D.) पदवीसाठी पात्रता प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि वाचनालय यांच्यावतीने शुक्रवारी विशेष अभिनंदन करण्यात आले.

प्रा. हेमंत महाडिक यांनी “महाराष्ट्र राज्यातील समुद्रकिनारा पर्यटनाचे विपणन” या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला होता. व्यवस्थापन शास्त्र (Management Science) विषयातील हा संशोधन प्रबंध विद्यापीठाने मान्य केला असून, त्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यासाठी पात्र घोषित करण्यात आले आहे. त्यांच्या संशोधनाला डॉ. आर. एस. शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले.

प्रा. महाडिक हे तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात कार्यरत असून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय आहेत. ते स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत.

त्यांच्या या यशाबद्दल स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट व स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना ट्रस्टचे उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर आणि वाचनालयाचे अध्यक्ष राजू वळंजू यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी ट्रस्टचे सचिव निकेत पावसकर, वाचनालयाचे सचिव मिनेश तळेकर, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, दीपक जठार, निलेश सोरप, विनोद धुरे, बापू वायंगणकर, रेश्मा तळेकर, श्रावणी मदभावे, ग्रंथपाल साक्षी तळेकर, मदतनीस नेत्रा पावसकर आदी उपस्थित होते.

या सत्कारप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी प्रा. महाडिक यांच्या संशोधन कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि संशोधन वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या यशामुळे तळेरे परिसरासह महाविद्यालय आणि वाचनालयाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

महाराष्ट्रातील सागरी पर्यटनावर संशोधन
प्रा. हेमंत महाडिक यांनी “महाराष्ट्र राज्यातील समुद्रकिनारा पर्यटनाचे विपणन” या विषयावर संशोधन केले आहे. महाराष्ट्राच्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटन विकास, विपणन धोरणे, पर्यटनवाढीच्या संधी आणि आव्हाने यांचा त्यांनी आपल्या संशोधनातून सखोल अभ्यास केला आहे. त्यांच्या या संशोधनाचा पर्यटन क्षेत्राला मार्गदर्शक ठरणारा उपयोग होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

शेअर करा