तळेरे येथे संत नामदेव महाराज समाधी सोहळा उत्साहात

शेअर करा

तळेरे,,दि.११ ऑगस्ट
तळेरे येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त तळेरे येथील श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रम पार पडले.

यानिमित्त सकाळी अभिषेक, त्यानंतर 10.30 वाजता सत्यनारायण महापूजा व आरती, दुपारी 1 ते 3 वाजता महाप्रसाद, त्यानंतर स्थानिक भजने सायंकाळी 7 वाजता वारकरी भजन व महाआरती करण्यात आली.

यानिमित्त समाजाला भूषण असलेले विविध गुणवंत व्यक्ती, डॉक्टरेट ॲवॉर्ड प्राप्त केल्याबद्दल राजेश माळवदे तसेच, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी प्राप्त केल्याबद्दल हेमंत महाडिक यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा