तळेरे : ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी संतोष नाईक यांची सलग सहाव्यांदा फेर निवड

शेअर करा

तळेरे,दि.२८ सप्टेंबर

ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी संतोष नाईक यांची सलग सहाव्यांदा फेर निवड करण्यात आलेली आहे. ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या ( मानव अधिकार संरक्षण संघटना ) माध्यमातून गेली पाच वर्ष उत्कृष्ट संघटनात्मक कौशल्याच्या जोरावर कार्य करत कोकण विभागात संघटनेची ताकद वाढविण्यासाठी संतोष नाईक यांनी मोलाचे योगदान दिले आहे. सामाजिक बांधिलकी जपून कोकण विभागात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, या ठिकाणी असणाऱ्या पदाधिकाऱ्यांशी व सदस्यांबरोबर असलेला सातत्यपूर्ण संपर्क तसेच संघटनेच्या विविध उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग यामुळे त्यांनी संघटनेमध्ये व समाजामध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.
तसेच संघटनेमधील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग यांच्यावतीने “कोकण रत्न” सन्मान 2026 हा विशेष पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या हस्ते देऊन संतोष नाईक यांचा गौरविण्यात आलेले आहे. त्यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे उपस्थित होते. तसेच बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समिती सिंधुदुर्ग या समितीवर अशासकीय सदस्य म्हणून जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी त्यांच्या संघटनेतील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन निवड केली आहे.
त्याचप्रमाणे शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, राजकीय, आरोग्य विषयक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या तसेच महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार संतोष नाईक यांची सलग सहाव्यांदा कोकण विभागीय अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या फेरनिवडीबद्दल राष्ट्रीय कार्यकारणीतील, महाराष्ट्र राज्य कार्यकारणीतील, कोकण विभागातील सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे सर्व पदाधिकारी व सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सामाजिक, राजकीय, क्रीडा, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदननाचा वर्षाव होत आहे.

शेअर करा