तळेरे,दि.२३ सप्टेंबर
श्री नवलादेवी नाद ग्राम विकास मंडळ, मुंबई यांच्या वतीने सन २०२६ या वर्षासाठी राबविण्यात आलेल्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा, नाद गावठण व भोळेवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
हा शैक्षणिक उपक्रम मंडळाचे कार्यकारणी सदस्य श्री. विनोद गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शाळेचे केंद्रप्रमुख श्री. पाटील सर, सर्व शिक्षकवृंद व सहकारी यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाद गावचे माजी सरपंच संतोष बाणे उपस्थित होते. तसेच गावातील मान्यवर ग्रामस्थ श्री. अर्जुन गुरव, श्री. चंद्रहास गुरव आणि श्री. बाळकृष्ण गुरव यांची तसेच सर्व स्थानिक ग्रामस्थ विशेष उपस्थिती लाभली.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देणे आणि त्यांना शालेय साहित्याच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील मंडळाचा प्रमुख उद्देश आहे.
या उपक्रमासाठी गावातील तसेच मुंबईस्थित ग्रामस्थांनी आर्थिक पाठबळ देऊन मंडळाच्या या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमास सहकार्य केले. त्यांच्या या मोलाच्या योगदानाबद्दल श्री नवलादेवी नाद ग्राम विकास मंडळ, मुंबई यांच्या वतीने सर्व देणगीदारांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
“विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार — उज्ज्वल भविष्याची भक्कम पायाभरणी”
श्री नवलादेवी नाद ग्राम विकास मंडळ, मुंबई