स्वातंत्र्यदिनी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने गौरव; पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन
तळेरे,दि. १७ ऑगस्ट
वैभववाडी तालुक्यातील गडमठ येथील यशस्वी तरुण उद्योजक आणि ऑरबिलोचे संचालक प्रणय बांदिवडेकर यांनी कणकवली ते जम्मू काश्मीर पर्यंतचा ३५०० किलोमीटरचा खडतर प्रवास मोटर सायकलने यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन (मानवाधिकार संरक्षण संघटना) संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार करुन सन्मानित करण्यात आले
या प्रवासात त्यांनी मानवाधिकार संरक्षण संघटनेचा प्रचार व प्रसार केला तसेच संघटनेमध्ये विविध उपक्रम स्वखर्चाने राबवत आहेत. अशा निस्वार्थी आणि तरुण उद्योजक व्यक्तिमत्त्वाचा सत्कार कोकण विभागाच्या वतीने (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर) गडमठ येथे आयोजित करण्यात आला होता. संघटनेच्या वतीने कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन प्रणय बांदिवडेकर यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच संघटनेच्या वतीने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी २०२६ मध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या वैभववाडी तालुक्यामधून प्रथम आलेली व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामीण सर्वसाधारण विभागातून द्वितीय आलेली विद्यार्थिनी कुमारी सानवी नारायण दळवी तसेच विशेष प्राविण्य मिळालेली कुमारी आर्या शांतिनाथ तेली, कुमार आराध्य अनिल मटकर यांचा सुद्धा संघटनेच्या सन्मानचिन्ह गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संघटनेचे कणकवली तालुकाध्यक्ष तथा स्पेक्टोमार्ट ऑप्टिकलस कणकवली प्रोप्रायटर मंगेश चव्हाण, ट्रॉफी हाऊस प्रोप्रायटर श्री. व सौ. महेंद्र चव्हाण, कणकवली तालुका सदस्य अक्षय शेडेकर, कीर्ती आंबेरकर, गडमठ गावचे सरपंच सौ. मालती शेट्ये, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तसेच कोकण विभागातील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


प्रणय बांदिवडेकर यांनी केलेला प्रवास.
📍 टप्पा १: पंजाब ते जम्मू-काश्मीर
- अमृतसर (सुवर्ण मंदिर आणि अटारी बॉर्डरवरून सुरुवात)
- श्रीनगर
- गुलमर्ग
- श्रीनगर (परत)
- सोनमर्ग
🏔️ टप्पा २: लडाख प्रवेश आणि झंस्कार खोरे
- झोजिला पास
- कार्गिल
- झंस्कार
- कार्गिल (परत)
🗺️ टप्पा ३: कार्गिल ते लेह (महामार्ग)
- नामिका ला पास
- फोटू ला पास
- लेह
🏜️ टप्पा ४: नुब्रा व्हॅली आणि भारत-पाक सीमा
- खारदुंग ला पास
- नुब्रा व्हॅली
- दिसकीत
- सँड ड्यून्स (Hunder Sand Dunes – वाळूच्या टेकड्या)
- तुर्तुक
- थांग (Thang – शेवटचे गाव)
🌊 टप्पा ५: पँगाँग आणि चांगथांग परिसर
- पँगाँग लेक
- हानले 🏍️ टप्पा ६: सर्वोच्च खिंड आणि चीन सीमा परिसर
- उमलिंग ला पास (जगातील सर्वोच्च मोटरेबल रस्ता)
- डेमचोक
- फोती ला पास
- हानले (परत)
- न्योमा
- पुगा व्हॅली
⛰️ टप्पा ७: मनाली-लेह हायवे (परतीचा प्रवास)
- लाचुंग ला पास
- नकीला पास
- बारालाचा ला पास
- जिस्पा
- मनाली 🏁 टप्पा ८: शेवटचा टप्पा
- चंदीगड (बाईक प्रवास समाप्त)