तळेरे,दि.०५ जुन
शिडवणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिडवणे नं. १ मध्ये ५ जून रोजी 'जागतिक पर्यावरण दिनाचे' औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आवड निर्माण व्हावी आणि पर्यावरणाचे रक्षण व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला
.
सकाळी ठीक पावणेदहा वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाला गावातील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. शिडवणे गावचे सरपंच रविंद्र शेट्ये यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा परिसरात एकूण ५ विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली. यामध्ये आंबा, रतांबा (कोकम), वड, पिंपळ आणि जांभूळ या पर्यावरणपूरक व बहुगुणी वृक्षांचा समावेश आहे
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य योगेश सुतार व तारीफ शेख, शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल, उपशिक्षक सुरेंद्र यादव उपस्थित होते. तसेच अंगणवाडी सेविका प्रियांका पाटणकर, मदतनीस कविता केतकर, ग्रामस्थ सत्यवान गुंडये व अनिल गुंडये यांनीही उपस्थित राहून वृक्षारोपणात सहभाग घेतला. शाळेचे विद्यार्थी मंथन भोवड आणि कार्तिक सुतार या विद्यार्थी प्रतिनिधींनी देखील मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण केले.