कै. विनय पावसकर यांच्या व्दितीय स्मृतिदिना निमित्त तळेरे येथे श्रद्धांजली

शेअर करा

तळेरे,दि.२२ जुलै

तळेरे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि दानशूर व्यक्तिमत्व कै. विनय केशव पावसकर यांच्या व्दितीय स्मृतिदिनाला मंगळवारी स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालय तळेरे या संस्थांच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा कार्यक्रम तळेकर वाचनालय येथे झाला.

सुरुवातीला विनय पावसकर यांच्या प्रतिमेला दीपक जठार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तळेरे गावचे माजी सरपंच, तळेरे आदर्श व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी म्हणून विनय पावसकर यांचे काम मोठे होते. त्यांच्या स्मृतीची आठवण सदैव येत राहते, असे भावोद्गार यावेळी व्यक्त केले.

यावेळी सरपंच हनुमंत तळेकर, ट्रस्टचे उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर, सचिव निकेत पावसकर, वाचनालयाचे अध्यक्ष राजू वळंजू, सचिव मिनेश तळेकर, बापू वायंगणकर, डॉ. हेमंत महाडिक, रेश्मा तळेकर, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष निलेश सोरप, विनोद धुरी, श्रावणी मदभावे, वाचनालयाच्या मदतनीस नेत्रा पावसकर आदी उपस्थित होते.

शेअर करा