तळेरे,दि.०९ ऑगस्ट
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ संलग्न कै राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडा घाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी कासार्डे येथे जनावरांसाठी लसीकरण केले. ग्रामीण कृषी जागृता व कृषी औद्योगिक कार्यनुभव कार्यक्रमाअंतर्गत हे शिबिर घेण्यात आले. या लसीकरण मोहिमेला पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांचे विशेष सहकार्य लाभले त्यांनी लंपी व FMD या रोगासाठी लसीकरण करण्यात आले त्या दरम्यान कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी वरुण पवार चैतन्य कोरके प्रथमेश खंडागळे ओंकार तवटे ऋषिकेश पोवाडी अथर्व शिखरे प्रथमेश शिवुडकर इंद्रजीत मिसाळ राज चव्हाण अनिल काकड यांनी परिश्रम घेतले व कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक सुशील कुमार मोटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले व कासार्डे गावच्या सरपंच सौ. निशा नकाशे यांचे सुद्धा विशेष सहकार्य लाभले
