तळेरे : भूमिका अभिनय स्पर्धेत वामनराव महाडिक विद्यालयाचा तालुक्यात डंका; प्रथम क्रमांक पटकावला

शेअर करा

तळेरे,दि.०९ सप्टेंबर

राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प २०२६-२७ अंतर्गत आयोजित कणकवली तालुकास्तरीय भूमिका अभिनय स्पर्धेत वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,तळेरेच्या बालकलावंतांनी आपल्या अफलातून अभिनयाने रसिकांची मने जिंकत माध्यमिक गटात प्रथम क्रमांक पटकावला.

कणकवली कॉलेजच्या रीडिंग १०१ हॉलमध्ये झालेल्या स्पर्धेत कुमार तेजस विजय जंगले, केतकी शरद वायंगणकर, मृण्मयी निलेश पवार व दुर्वा अनिल कुमठेकर या चार विद्यार्थ्यांनी ‘पोषण,आरोग्य आणि स्वच्छता’ या विषयावर प्रभावी भूमिका अभिनय सादर केला.विशेष म्हणजे इयत्ता नववीतील CWSN विद्यार्थी तेजस जंगले याने दिव्यांगत्वावर मात करत आत्मविश्वासपूर्ण अभिनयाची उत्कृष्ट झलक दाखवून उपस्थितांची विशेष दाद मिळवली. त्याच्या सहभागाचे व तयारीचे सर्वत्र कौतुक झाले.

या भूमिकेची प्रभावी संवादप्रत सहाय्यक माध्यमिक शिक्षिका अन्वि चेतन गवाणकर यांनी लिहिली. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.

या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्य कार्य.अधिकारी श्रीकृष्ण खटावकर,शाळा समितीचे चेअरमन अरविंद महाडिक,सर्व शाळा समिती सदस्य,प्राचार्य अविनाश शिवराम मांजरेकर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवृंद, विद्यार्थी तसेच आजी-माजी विद्यार्थ्यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना मिळालेले हे यश विद्यालयाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचालीतील अभिमानाचा क्षण ठरला आहे.

शेअर करा