तळेरे : भूमिका अभिनयात वामनराव महाडिक विद्यालयाचा जिल्ह्यात डंका

शेअर करा

कणकवली तालुक्याला जिल्ह्यात प्रथम क्रमांक; कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड

तळेरे,दि.१६ सप्टेंबर

राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प सन २०२६-२७ अंतर्गत सप्टेंबर २०२६ मध्ये कणकवली महाविद्यालयातील HPCL हॉल येथे जिल्हास्तरीय लोकनृत्य व भूमिका अभिनय स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधून सहभागी झालेल्या संघांमध्ये भूमिका अभिनय स्पर्धेत वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळेरे या विद्यालयाच्या संघाने हिंदी भाषेत प्रभावी सादरीकरण करत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.

या विजयी संघात नववीतील केतकी वायंगणकर,दुर्वा कुमठेकर,मृण्मयी पवार आणि दिव्यांग विद्यार्थी तेजस जंगले यांचा समावेश होता.तेजस जंगले याच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र असून,त्याच्या सहभागाचे विशेष कौतुक करण्यात आले.या उल्लेखनीय कामगिरीमुळे संघाची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल विषयतज्ज्ञ वैदेही पिळणकर(पंचायत समिती,कणकवली)सचिन सर्पे व प्रशांत सर्पे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.यावेळी तेजस जंगले याला भेटवस्तू देऊन त्याचे विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात आले.बक्षीस वितरण समारंभ दरम्यान सिंधुदुर्ग DIETचे प्राचार्य राजेंद्र कांबळे,सागर तुपे,पारकर,
गायकवाड व इतर सहभागी संघ उपस्थित होते.

प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की,“विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळाले की त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नवी दिशा मिळते.” या विद्यार्थ्यांनी मेहनत, आत्मविश्वास आणि संघभावनेच्या जोरावर जिल्ह्यात विद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे.तेजसच्या सहभागाने सर्वसमावेशक शिक्षणाचा सुंदर आदर्श निर्माण केला आहे.आता विभागीय स्तरावरही याच जिद्दीने उत्तम कामगिरी करून यशाची परंपरा कायम ठेवावी.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर,शाळा समितीचे चेअरमन अरविंद महाडिक,सर्व शाळा समिती सदस्य,प्राचार्य अविनाश मांजरेकर,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,आजी-माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा