तळेरे : कासार्डेत रंगला रानभाज्या व गावठी बाजार; विद्यार्थ्यांनी केली ४२ हजारांची उलाढाल

शेअर करा

१२ शाळांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘वोकल फॉर लोकल’सह स्वावलंबनाचा संदेश

तळेरे,दि.१२ ऑगस्ट

कासार्डे केंद्रातील जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा रानभाज्या व गावठी बाजार कासार्डे तिठा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवात कासार्डे केंद्रातील कासार्डे व ओझरम गावातील १२ शाळांनी विदयार्थी, मुख्याध्यापक व शिक्षक यानी सहभाग घेत शनिवार सकाळी सुरु झालेला बाजार दुपारपर्यंत मान्यवर व ग्रामस्थांचा उस्फूर्त सहभाग होत रु.४२,६३०/- रुपयांची उलाढाल झाली. आनंददायी शिक्षण या संकल्पने अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वोकल फॉर लोकल स्थानिक उत्पादनांचा सन्मान व स्वावलंबनाची भावना रुजविणे हा मुख्य उद्देश असल्याचे केंद्रप्रमुख नितीन पाटील यानी सांगितले.

तत्पूर्वी जेष्ठ समाजसेवक बाळकृष्ण सावंत यांच्या शुभहस्ते या बाजाराचे फित कापून उद्घाटन करण्यात आहे.यावेळेस सभापती हर्षदा वाळके,जि.प.सदस्य सदस्य संतोष पारकर,पं.स. सदस्य सहदेव खाडये,माजी जि. प.सदस्य संजय देसाई,कासार्डे सरपंच निशा नकाशे,ओझरम सरपंच समृद्धी राणे, कासार्डे उपसरपंच गणेश पाताडे, मा. सभापती प्रकाश पारकर, ओझरम उपसरपंच प्रशांत राणे, केंद्र प्रमुख नितीन पाटील,संजय पवार.ग्रा.पं.सदस्य कासार्डे प्रणय जोशी, अभिजित धुमाळ,सुधाकर राणे,खरेदी विक्री संघाचे संचालक श्रीपत पाताडे, सोसायटी चेअरमन दिपक सावंत, पोलीस पाटील महेंद्र देवरुखकर, महेश आयरे, स्वाती पाताडे,रिद्धी मुणगेकर,मा. सरपंच प्रदीप राणे, ग्राम. अधिकारी सुर्याजी वालावलकर, हाय. मुख्याध्यापिका भाग्यश्री बिसुरे,पर्यवेक्षक अवधूत घुले पालक संघाचे उपाध्यक्ष बबन मुणगेकर, राजा सावंत,अतुल सावंत,अशोक राणे, गणेश राणे, निळकंठ पाताडे,अभिजित शेटये, दयानंद पाताडे, केंद्रातील सर्व मुख्याध्यापक,शिक्षक,शा. व्य. स.अध्यक्ष, सदस्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

सर्व मान्यवरांचे स्वागत रानभाज्या आणि मक्याच्या कणसांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.या रानभाज्या व गावठी बाजारात रानभाज्या, लाडू,घावणे,तयार अळुवड्या, सर्व प्रकारचे गावठी पिठ,लोणची, तांदूळ, नाचणी, कोंबडी, अंडी, कुर्ल्या ही विक्री ला आणण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे गवताच्या पातीच्या कोरी चहाही ठेवण्यात आली होता. कासार्डे, ओझरम आणि दशक्रोशीतील  ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवीत विद्यार्थ्यांनी विक्री ला आणलेल्या रानभाज्यांची मनसोक्त खरेदी करत विद्यार्थ्यांना आनंदी केले.ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शविली आणि मनोसक्त खरेदी केली.

शाळेतील विद्यार्थ्यांनी रानभाज्या, स्थानिक फळे, गावठी घरगुती पदार्थ, कृषी उत्पादने  वस्तूंचे स्टॉल उभारून प्रत्यक्ष खरेदी- विक्रीचा अनुभव घेत विद्यार्थ्यांनी रानभाज्यांचे नाव, पौष्टिक मूल्य, औषधी उपयोग, उपलब्धतेचा कालावधी व पर्यावरणीय महत्त्व याविषयी उपस्थितांना माहिती दिली.घोषवाक्ये,पोस्टर्स, माहितीपत्रके सादरीकरण करत जनजागृती केली.विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, स्वयंरोजगार व व्यवसाय कौशल्यांचा विकास करणे आण नफा-तोटा, खर्च, उत्पन्न, मोजमाप, व्यवहार अशा गणितीय संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याबरोबर संवाद कौशल्य, नेतृत्व, नियोजन, जबाबदारी व आत्मविश्वास विकसित करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजनचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.या कार्यक्रमासाठी कासार्डे केंद्र प्रमुख नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कासार्डे केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.

शेअर करा