तळेरे गावातील तरुण व्यावसायिक कु. वैभव उर्फ भैय्या खटावकर यांचे अकाली दुःखद निधन

शेअर करा

तळेरे,दि.१९ सप्टेंबर

तळेरे गावातील तरुण व्यावसायिक कु.वैभव उर्फ भैय्या खटावकर ( वय- २६ वर्षे) यांचे आज सकाळी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान अकाली दुःखद निधन झाले.
वैभव उर्फ भैय्या खटावकर हा युवक तळेरे एसटी बसस्थानका समोरील ब्रीज खाली शेवपूरी, पाणीपुरीचा व्यवसाय करीत असे. अतिशय मेहनती आणि कष्टाळू व मनमिळावू स्वभावामुळे त्याचा मित्र परिवार देखील मोठा होता. तळेरे येथील व्यावसायिक दत्तात्रय खटावकर यांचा चिरंजीव होय. तसेच रिक्षा व्यावसायिक मंगेश आणि हाॅटेल शिवशाहीचे संचालक रंजन खटावकर यांचा पुतण्या होय. त्यांच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ आणि दोन विवाहित बहिणी तसेच काका, काकी, चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे.
आज दुपारी १२ वाजता तळेरे स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या अकाली निधनामुळे तळेरे बाजारपेठ बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच या दुःखद घटनेमुळे तळेरे परिसरात शोककळा पसरली होती.

शेअर करा