सिंधुदुर्ग काँग्रेस उपाध्यक्षपदी कणकवली तालुक्यातून तिघांची निवड

शेअर करा

नागेश मोरये, आतिश उर्फ भाई जेठे, अनिल डेगवेकर यांची निवड

कणकवली,दि.३० जून

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी नागेश मोरये, आतिश उर्फ भाई जेठे, मेघनाथ धुरी, विजय प्रभू, वासुदेव नाईक, अनिल डेगवेकर यांचा समावेश आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी याबाबतचे आदेश दिले असून त्यांच्या सूचनेनुसार या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. कणकवली तालुक्यात तीन उपाध्यक्ष काँग्रेस पक्षाकडून संघटनात्मक बांधणी करण्यासाठी देण्यात आले आहेत .

शेअर करा