मुंबई येथील मुक्तपीठ सन्मान पुरस्कार २०२६ टीव्ही नाईन मराठीचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी पत्रकार विकास गावकर यांना

शेअर करा

मालवण दि प्रतिनिधी:

मुंबई येथील मुक्तपीठ सन्मान पुरस्कार २०२६ टीव्ही नाईन मराठीचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी पत्रकार विकास गावकर यांना देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मुंबई येथे नुकतेच या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार, लेखक तुळशीदास भोईटे यांनी लिहिलेल्या ‘लोकशाही, संविधान आणि पक्षांतर’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार तुलसीदास भोईटे मुंबई उच्च न्यायालयांचे निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोदे, अर्थतज्ज्ञ, माजी सल्लागार IMF, नियोजन आयोग, माजी खासदार डॉ. नरेंद्र जाधव, ज्येष्ठ पत्रकार, नाटककार ज्ञानेश महाराव, विचारवंत, लेखक, कवी, कलाकार संजीव खांडेकर, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी, वंचित बहुजन आघाडीचे सिद्धार्थ मोकळे, ऍड.अनिता बाफना, राजेंद्र हुंजे, ऍड जयशेष वाणी, नरेंद्र बंडबे, कबीर नाईकनवरे, रुशाली सारंग, शरयू यादव, राहुल रानाळकर,आदी उपस्थित होते यावेळी सर्वोत्तम राष्ट्रीय अँकर व संपादक डिजिटल साहिल जोशी, सर्वोत्तम राजकीय संपादक प्रिंट.मिडिया यदु जोशी, सर्वोत्तम संपादक टीव्ही व सर्वोत्तम अँकर, स्पेशल शो सरिता कौशिक, सर्वोत्तम रिपोर्टर, पश्चिम महाराष्ट्र रवींद्र कांबळे आणि सर्वोत्तम रिपोर्टर, कोकण विकास गावकर यांच्या सह राज्यातील माध्यम क्षेत्रातील प्रतिभावंतांचा मुक्तपीठ मार्फत सन्मान करण्यात आला.

शेअर करा