साळगाव-माणगाव रस्त्यावरील पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

शेअर करा

कुडाळ,दि.०८ सप्टेंबर :

साळगाव-माणगाव रस्त्यावरील पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

कुडाळ,दि.०८ सप्टेंबर :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील साळगाव-मळवाडी ते साळगाव-माणगाव रस्त्यावरील पुलाखाली एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
आज सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. याबाबत संबंधित पोलीस पाटलांनी तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती दिली.
माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून, घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, मृतदेह नेमका कोणाचा आहे, तसेच या व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनीही घटनास्थळी गर्दी केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे कामही सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात सध्या चर्चेला आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

शेअर करा