वैभववाडी : भाजपाचे संघटन बळकटीसाठी गावागावात जनतेशी संपर्क वाढवा – आमदार प्रमोद जठार

शेअर करा

कासार्डे येथे लांजा-राजापूर विधानसभा चिंतन बैठक ; प्रत्येक गावात संघटनात्मक बांधणी करा

वैभववाडी,दि.२० सप्टेंबर

लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चिंतन बैठक कासार्डे येथील अभिषेक मंगल कार्यालयात आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत भाजपाचे संघटन बळकटीसाठी गावागावात जनतेशी संपर्क वाढवा असे आवाहन भाजपाचे आ. प्रमोद जठार यांनी केले.
यावेळी रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, सरचिटणीस अभिजित गुरव, राजापूर मंडल अध्यक्ष ॲड. एकनाथ मोंडे, मोहन घुमे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप नाचणकर, चंद्रकांत मांडवकर, शिल्पा मराठे, श्रुती ताम्हणकर, अमित केतकर, संजय यादव, सुरेश गुरव, शैलेश खामकर, प्रथमेश बेंडल, अमोल कानडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन जनतेशी थेट संपर्क साधावा, नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक व सेवा उपक्रम राबवावेत. तळागाळातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संघटनेची ताकद अधिक व्यापक करण्यासाठी प्रत्येकाने सक्रियपणे योगदान देणे आवश्यक आहे. आगामी काळातील संघटनात्मक कामकाज, विविध उपक्रम आणि जनसंपर्क ठेवण्याचे आवाहन आ. प्रमोद जठार यांनी केले.

शेअर करा