वैभववाडी : लहान गटात वेदांग साळसकर तर मोठ्या गटात कु.उर्वी तेली प्रथम

शेअर करा

वैभववाडी ,दि.०३ ऑगस्ट
   केंद्रशाळा जिल्हा परिषद बिडवाडी नंबर एक येथे ग्रामविकास संघटना बिडवाडी यांच्यावतीने घेण्यात आलेल्या आंतरशालेय वकृत्व स्पर्धेत  लहान गटात कु.वेदांग सूर्याजी साळसकर(प्रथम),
कु.परिधि सुमंतक तांबे(द्वितीय), रिहान राकेश चव्हाण(तृतीय)तर मोठ्या गटात कु.उर्वी रवींद्र तेली(प्रथम),जयभवानी दिवाकर मेस्त्री(द्वितीय),कु.हर्षिता एकनाथ पवार(तृतीय) यांनी अनुक्रमे यश संपादन केले.या सर्व विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांना ग्रामविकास संघटनेच्या वतीने अनुक्रमे १०००/- रुपये,५००/- रुपये, ३०१/- रुपये व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
   ग्रामविकास संघटना अध्यक्ष श्री. मनोज फोंडके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.तर या स्पर्धेत प्राथमिक शाळातील सुमारे ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व ग्रामविकास संघटनेचे अध्यक्ष श्री.मनोज फोंडके,उपाध्यक्ष श्री.दिवाकर मेस्त्री, सचिव – निलेश साटम,खजिनदार – संतोष तेली, सदस्य – मनोहर ठुकरुल,संदीप तांबे,हेमंत चव्हाण,निलेश राणे, भूषण चव्हाण उपस्थित होते.तर प्रमुख उपस्थिती मध्ये श्री राष्ट्रपती पदक विजेते ए एस आय श्री. बाळकृष्ण कावले,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष – श्रीम.राधिका तेली, मुख्याध्यापिका सौ राजम मॅडम, श्री. नंदकुमार सरंगले,सौ. अमृता चव्हाण मॅडम,अनंत लोरेकर, अनंत तांबे,आदी मान्यवर उपस्थित होते.

चौकट..
     तसेच ग्रामविकास संघटना बिडवाडी यांच्या वतीने सामाजिक बांधीलकी जपत जून महिन्यात बिडवाडी गावातील चारही जिल्हा परिषद शाळेतील सुमारे ७० विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप देखील केले होते. या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत जि.प.शाळा बिडवाडी नं.१,जि.प.शाळा बिडवाडी मुडे डोंगर, जि.प.शाळा बिडवाडी कणखरे, जि.प. शाळा बिडवाडी हुंबरणे,या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.तर या वक्तृत्व स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून श्री. महादेव असरोंडकर,श्री.नितीन कदम, श्रीकांत बुचडे यांनी काम पाहिले.
तसेच या वक्तृत्व स्पर्धा कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचलन शाळेचे शिक्षक श्री अजय तांबे व सौ राजम यांनी केले.तर आभार अजय तांबे सर यांनी मानले.

शेअर करा