वेंगुर्ला : पर्यावरण दिनी केली ५०० वृक्षांची लागवड

शेअर करा

वेंगुर्ला न प चा उपक्रम

वेंगुर्ला ,दि.०५ जुन (प्रथमेश गुरव)

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ले नगरपरिषदेतर्फे आज ५ जून जागतिक पर्यावरणदिनी मेजर ध्यानचंद क्रीडांगणाच्या बाजूला कोकम व जांभूळ फळाच्या ५०० रोपांची लागवड करण्यात आली. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्यासहित उपस्थित नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी यांनी स्वतः जबाबदारी घेऊन प्रत्येकी १० रोपे लावली. आहेत, या सर्व रोपांची काळजी हे सर्वजण वर्षभर घेणार आहेत. पुढच्या वर्षी यातील पाच उत्कृष्ट संगोपन केलेल्या झाडांना रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहेत.
    यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, नगरसेवक सुषमा प्रभुखानोलकर, शीतल अंगाचेकर, प्रणव वायंगणकर, दाजी परब, प्रशांत आपटे, संदेश निकम, रवी शिरसाट, रिया केरकर, आकांक्षा परब, समिधा रेडकर, लीना म्हापणकर, प्रीतम सावंत, सुधीर पालयेकर, सुमन निकम, विनय नेरुरकर, युवराज जाधव, सचिन शेटये, काजल कुबल यांच्यासहित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


यावेळी कॅम्प येथील मेजर ध्यानचंद क्रीडांगणाच्या सभोवतीच्या जागेत कोकम व जांभूळाच्या रोपांची लागवड करण्यात आली. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्या सहित प्रत्येक नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी यातील १० झाडे दत्तक घेऊन त्या झाडांचे वर्षभर संगोपन करणार आहेत. पुढच्या वर्षीच्या पर्यावरण दिनाअगोदर कृषी तज्ज्ञांद्वारे गा झाडांची तपासणी केली जाणार आहेत. या पाहणीत उत्कृष्ट अंगोपन करून चांगली वाढ झालेल्या पाच झाडांना क्रमांक देऊन झाडांच्या पालकांना रोख रकमेचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पालिकेला या वर्षभरात २५ हजार रोपांची लागवड करायची आहे. टप्प्या टप्प्यात वर्षभर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. पुढच्या वर्षी पर्यावरण दिनी हीच चळवळ नागरिकांसाठी खुली करण्यात येणार आहे. पालिकेतर्फे मोहिमेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना पाच रोपे देण्यात येतील. त्यांची लागवड करून जे नागरिक झाडांचे उत्तम आरोग्य राखण्यात यशस्वी होतील, त्यांना गौरविण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष दिलिप गिरप यांनी सांगितले.

शेअर करा