वेंगुर्ला,दि.०७ ऑगस्ट
उभादांडा-सिद्धेश्वरवाडी येथील सन्मार्ग सिद्ध आई नरसुले यांची ४१वी पुण्यतिथी रविवार दि.९ ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे. यानिमित्त पहाटे ५ वा. काकड आरती, ८ वा. समाधीस अभिषेक, सकाळी १०वा. कीर्तन, दुपारी १ वा. आरती व महाप्रसाद, दुपारी ३.३० वा. इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, सायं. ७ नंतर भजनाचा कार्यक्रम होईल. सर्वांनी तीर्थप्रसादाचा व समाधी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आई नरसुले समाधी मंदिर विश्वस्त गजानन नरसुले आणि व्यवस्थापक ह.भ.प.मोहनदास नरसुले यांनी केले आहे.