संत साहित्याच्या अभ्यासातील योगदानाची दखल
वेंगुर्ला,दि.०८ऑक्टोंबर
मुंबई मराठी साहित्य संघाच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा “कै.वि.स.पागे अध्यात्मिक वाङ्मय पुरस्कार” यंदा संत साहित्याचे गाढे अभ्यासक ॲड. देवदत्त दिगंबर परुळेकर यांना जाहीर झाला आहे.
रोख रुपये १० हजार आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून संस्थेच्या वर्धापनदिन सोहळ्यात ३१ ऑक्टोबर रोजी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. संत साहित्य, अध्यात्म आणि वारकरी परंपरेच्या अभ्यासासह त्यांनी केलेल्या वाङ्मयीन योगदानाची दखल घेऊन निवड समितीने एकमताने त्यांची निवड केली आहे. ॲड. परुळेकर यांच्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.