३० जून रोजी बॅ. नाथ पै समुदाय केंद्रात वेंगुर्ले मध्ये पदग्रहण सोहळा
वेंगुर्ले,दि.२८ जून
रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन या क्लबची सन २०२६-२७ या कालावधीसाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. या कार्यकारणीच्या अध्यक्षपदी अँड, प्रथमेश नाईक सचिवपदी मुकुल सातार्डेकर – पाध्यक्षपदी पंकज शिरसाट तर खजिनदारपदी विष्णू उर्फ उदय दाभोलकर यांची सर्वानुमते निवड झालेली आहे. या नूतन कार्यकारिणी पदाधिकारी पदग्रहण सोहळा ३१७१ झोनचे सन २०२७-२८ चे बेळगाव येथील नवनियुक्त डिस्ट्रीक गळूनर अशोक नाईक यांच्या हस्ते मंगळवार ३० जून रोजी वेंगुर्ले पंचायत समिती कार्यालयानजीकच्या बॅ. नाथ पै समुदाय केंद्रामध्ये सायंकाळी ७ वाजता संपन्न होणार आहे अशी माहिती रोटरी क्लब मिडटाऊन वेंगुर्लेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अँड प्रथमेश नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली
येथील रोटरी क्लब ऑफ मिडटाउन वेंगुर्लाच्या कार्यालयात या पदग्रहणं सोहळ्याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत क्लबचे नूतन अध्यन अँड प्रथमेश नाईक यांनी यासंदर्भात माहिती दिली यावेळी उपस्थितांत नुतन सचिव मुकुल सातार्डेकर, नगराध्यक्ष दिलीप गिरप. मावळते अध्यक्ष आनंद बोवलेकर, योगेश नाईक अनमोल गिरप यांचा समावेश होता.
यावेळी रोटरी क्लबचे चेअरमन अँड प्रथमेश नाईक यांनी रोटरी क्लबच्या मंगळवार दि ३० जून रोजी होणाऱ्या नुतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यात रोटरी क्लब मधील पाल्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे
वेंगुर्ले कॅम्प येथील पंचायत समिती कार्यालयानजीकच्या बॅ. नाथ पै समुदाय केंद्रात रोटरी क्लबच्या नूतन पदाधिकारी व कार्यकारणी ज्या पदग्रहण सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११ रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित रहाणार आहेत. वेंगुर्ले तालुक्यातील विविध संस्था, मंडळे यांचे पदाधिकारी व सदस्य सामाजिक कार्यकर्ते यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून पदग्रहण सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन चेअरमन अँड प्रथमेश नाईक यांनी केले आहे.