वेंगुर्ला : अणसूर-पाल हायस्कूल अणसूर चे शिष्यवृत्ती परीक्षेत यश!

शेअर करा

वेंगुर्ला, दि. ६ जुलै

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पूणे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत(इ.८वी) अणसूर पाल हायस्कूल अणसूरची कु. हर्षदा निलेश धुरी ही गुणवत्ता यादीत झळकली.तीला पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत १६४ गुण (५४.६६%)गुण प्राप्त झाले आहेत.
काल जाहिर झालेल्या गुणवत्ता यादीत तीचा वेंगुर्ला तालुक्यांतून १३ वा क्रमांक जिल्ह्यातून ८८वा क्रमांक आला आहे.ग्रामीण भागातील असुनही तिनं मिळवलेलं हे यश निश्चितच आश्वासक व कौतुकास्पद आहे.तीने मिळवलेल्या या यशाबद्दल आज प्रशालेत मुख्याध्यापक राजेश घाटवळ ,ज्येष्ठ शिक्षिका सौ.पेडणेकर अक्षता ,सहा.शिक्षक विजय ठाकर ,सौ.प्रीती परब ,सौ.संचिता परब यांनी शाल व भेटवस्तू देऊन तिचे अभिनंदन केले.


अणसूर पाल विकास मंडळ मुंबई संस्था अध्यक्ष श्री.गोविंद गावडे,सचिव श्री.लिलाधर गावडे,सर्व संस्थासदस्य,शालेय समिती चेअरमन श्री.मातोंडकर सर, सदस्य दिपक गावडे, दत्ताराम गावडे, देऊ गावडे व सर्व शालेय परिवार यांनी कु.हर्षदा धुरी हीचे हार्दिक अभिनंदन केले.

शेअर करा