वेंगुर्ला: सावंतवाडी येथील बुद्धिबळ स्पर्धेत वेंगुर्ल्याचा अन्वय सापळे प्रथम

शेअर करा

वेंगुर्ला,दि.०७ ऑगस्ट

सावंतवाडी येथे ५ जुलै रोजी जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी घेण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत वेंगुर्ला येथील मदर तेरेसा स्कूलमधील इयत्ता चौथीमधील विद्यार्थी कु.अन्वय जगदीश सापळे याने ११ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक पटकाविला.
त्याला आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्यासह अन्य नगरसेवक तसेच सावंतवाडी नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कु. अन्वय याच्या या यशामुळे सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.

शेअर करा