वेंगुर्ला : मातोंड हायस्कुलच्या बहुउद्देशीय सभागृहाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

शेअर करा

वेंगुर्ला,दि.२० सप्टेंबर
तालुक्यातील मातोंड भागातील नागरिकांच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांच्या सोयीसाठी एका सुसज्ज अशा बहुउद्देशीय सभागृहाचा भूमिपूजन समारंभ अत्यंत मंगलमयी आणि उत्साही वातावरणात पार पडला.
​सदरचे सुसज्ज सभागृह कै. देवराव हिरे परब यांची मुलगी कै. सुहासिनी सत्यवान गावडे यांच्या स्मरणार्थ ‘ओंकार कन्स्ट्रक्शन, मुंबई’ यांच्यामार्फत बांधण्यात येणार आहे. या बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन मातोंड देवस्थान कमिटीचे अध्यक्ष हिरोजी देवराव परब (दादा परब) यांच्या हस्ते शनिवारी (१९ सप्टेंबर) संपन्न झाले.
​न्यू इंग्लिश स्कूल, मातोंड येथे पार पडलेल्या या सोहळ्याला ओंकार कन्स्ट्रक्शनचे राजू गावडे यांच्यासह मातोंड ग्रामस्थ सत्कार्योत्तेजक संस्था (मुंबई) यांचे सर्व सदस्य, गावकर मंडळी, आजी- माजी विद्यार्थी व समस्त मातोंड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभागृहामुळे परिसरातील नागरिकांना विविध उपक्रमांसाठी एक उत्तम व्यासपीठ व सोय उपलब्ध होणार असल्याने ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

शेअर करा