वेंगुर्ला : भाजपातर्फे माजी सैनिक प्रताप राणे यांचा सन्मान

शेअर करा

वेंगुर्ला ,दि. १८ ऑगस्ट

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी भाजपाच्यावतीने वजराठ येथील माजी सैनिक कॅप्टन प्रताप राणे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा शाल व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच त्यांनी देशसेवेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, माजी सरपंच सूर्यकांत परब, ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत परब, तालुका चिटणीस नितीन चव्हाण, वामन भोसले, माजी सरपंच महेश राणे, उपसरपंच दीपिका राणे, पांडुरंग राणे, चंद्रकांत राणे, सुरेश राणे, नंदकिशोर राणे, श्यामसुंदर मांजरेकर यांच्यासह श्री. राणे कुटुंबिय व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा