अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आयोजन; मराठी साहित्य-संस्कृतीचा जागर
वेंगुर्ला,दि.०८ऑक्टोंबर
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त नगर वाचनालय, वेंगुर्ला या संस्थेमध्ये दि. ९ व १० ऑक्टोबर कालावधीत ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. मराठी भाषेचा प्रचार-प्रसार वाढविणे, दैनंदिन कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर वाढविणे आणि मराठी भाषेच्या समृद्ध साहित्यिक व सांस्कृतिक परंपरेची माहिती करुन देणे आणि मराठी भाषेविषयी अभिमान व आपुलकीची भावना वृध्दिंगत करणे या ग्रंथप्रदर्शनामागचा प्रमुख उद्धेश आहे.
या प्रदर्शनामध्ये ललित, लेख, कथा, कादंबऱ्या, स्पर्धापरीक्षासाठी उपयुक्त पुस्तके तसेच भविष्य, खेळ, नाटक, ऐतिहासिक, काव्य अशा विविध विषयावरील ग्रंथांचा समावेश आहे. तरी सर्वांनी ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.