वेंगुर्ला,दि.२४ जून
वेंगुर्ला तालुक्यात दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने सर्वांनाचा दिलासा दिला असून शेतकरीवर्गही सुखावला आहे. वादळी वा-यासह आलेल्या पावसाने तालुक्यात दोन ठिकाणी घरांवर झाडे पडून सुमारे 70 हजार रूपयांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
जून महिना संपत आला तरी पाऊस सक्रीय होण्याची चिन्हे दिसत नव्हती. एप्रिल-मे प्रमाणेच जुन महिन्यातही कडक उन्हाळा जाणवत होता. आलीच तर एखादी पावसाची सर तात्पुरता गारठा निर्माण करीत होती. त्यानंतर मात्र, कडक उष्णतेचा सामना करावा लागत होता. दरम्यान, सोमवारी रात्री आणि मंगळवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी अधूनमधून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरूच होते. वादळी वा-यासह पडलेल्या पावसाने मंगळवारी सकाळी सागरतीर्थ येथील किस्तु सोेज यांच्या घरावर चिंचेचे झाड पडून सुमारे 50 हजार रूपयांचे नुकसान झाले. तर सायंकाळी आरवली येथील अंकुश रूद्रे यांच्या घरावर नारळाचे झाड पडून घराच्या छप्पराचे एकूण 20 हजार रूपयांचे नुकसान झाले. बुधवारपर्यंत 243 मी.मी. एवढ¬ा पावसाची नोंद झाली आहे.
फोटोओळी – किस्तु सोेज यांच्या घरावर चिंचेचे झाड पडून घराचे नुकसान झाले.