केवळ प्रतिज्ञांचे वाचन करून उपयोग नाही; बौद्ध धम्माची मूल्ये जीवनात रुजविण्याचे आवाहन!
वेंगुर्ला,दि.२३ ऑक्टोंबर
डॉ.आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बौद्ध धम्माची दिक्षा घेऊन त्यांनी २२ प्रतिज्ञांचे महत्त्व अनुयायांना दिले. आता केवळ प्रतिज्ञांचे वाचन करून उपयोग नाही, तर त्या प्रत्यक्ष आचरणात आणणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्रिरत्न महासंघ, सिंधुदुर्गचे धम्मचारी जिनचित्त यांनी केले.
सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ-मुंबई शाखा वेंगुर्ला यांच्यावतीने आनंदवाडी येथील समाज मंदिरात नुकताच ७०वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी महासंघाचे सचिव जयंत जाधव यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपासक अमोल जाधव व गौतम जाधव यांनी बुद्धपूजा तसेच बुद्धवंदना घेतली. अवनी जाधव यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी मार्गदर्शन करताना जिनचित्त म्हणाले की, जसा एक छोटासा दिवा अंधार दूर करून प्रकाश निर्माण करतो, त्याचप्रमाणे धम्मातील प्रज्ञा, करूणा आणि समतेचे विचार माणसाच्या जीवनातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि भेदभाव दूर करण्यास मदत करत असल्याचे सांगितले. यानंतर २२ प्रतिज्ञांचे सामुहिक वाचन करून त्यानुसार आचरण करण्याचा संकल्पही करण्यात आला. महासंघाचे अध्यक्ष प्रेमानंद जाधव यांनीही आपले विचार मांडले.
या कार्यक्रमाला महासंघाचे उपाध्यक्ष गजानन जाधव, सल्लागार वाय. जी. कदम यांच्यासह राहुल कांबळे, राजन जाधव, प्राविण्य जाधव, तनिष्क जाधव, शुभम जाधव, प्रदीप जाधव, सिद्धार्थ जाधव, तेजस जाधव, सत्यवान जाधव, दामोदर जाधव, गणपत जाधव, किरण जाधव, जतिन जाधव, राजन कांबळे, प्रज्ञेश जाधव, मानसी जाधव, छाया सागर, अवनी जाधव, सुप्रिया जाधव, रेणुका जाधव, सई जाधव, तनिष्का जाधव, गीतांजली जाधव, मनाली जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल जाधव यांनी केले, तर गौतम जाधव यांनी आभार मानले.