वेंगुर्ला,दि.१८ सप्टेंबर (प्रथमेश गुरव) –
कोकणात गणेशोत्सवाला प्रारंभ झाल्यानंतर आज शुक्रवारी वेंगुर्ला तालुक्यासह शहरातील पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले.
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून घरोघरी मोठ्या उत्साहात गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गेले चार दिवस रात्ररात्र भजने सुरू होती. दरम्यान, आज शुक्रवारी पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. वेंगुर्ला शहरात साकव, पत्र्याचे पूल, चाफाळगा, आडीपूल, मांडवी खाडी, मानसी खाडी, वेशी भटवाडी याठिकाणी गणपतींचे विसर्जन करण्यात आले. गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी आणि गुरूवारी हजेरी लावली. तर ओहोळातील पाणी आटल्याने शहरातील साकव ओहोळावर बांध घालून पाणी अडविण्यात आल्याने विसर्जनावेळी मुबलक पाण्याचा साठा उपलब्ध झाला.