वेंगुर्ले,दि.२७ जुलै
दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी वेंगुर्ले तालुक्यातील खानोली सुरंगपाणी येथिल श्री. विठ्ठल पंचायतन देवस्थान सुरंगपाणी येथे दि. २९ जुलै रोजी गुरु पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार असून या निमित्त विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दि. २९ जुलै रोजी संध्याकाळी ०६ वाजता प.पू. दादा पंडित महाराज यांची सर्व भक्त परिवाराच्या वतीने पाद्य पूजा करण्यात येणार आहे.
श्री. विठ्ठल पंचायतन देवस्थान सुरंगपाणी या स्थानावर आतापर्यत जवळपास २ हजारचे वरती लोकांना दादा महाराज यांनी मार्गदर्शन देवून त्यांचे कौटूंबिक समस्या व प्रश्न सोडविले आहेत. या सर्व भक्तानी एकत्र येवून १७ जुलै रोजी ७४ वा वाढदिवस मोठ्या भक्ती भावाने साजरा केला त्याच अनुसंधाने गुरुपौर्णीमा दिवशी त्यांची भक्ता परिवाराचे वतीने पाद्य पुजा करण्यात येणार असत्याने सर्वानी उपस्थित राहून पाद्य पुजेचा लाभ घ्यावा
तरी भक्तांनी सहपरिवार सहकुटुंब या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन श्री. विठ्ठल पंचायतन देवस्थान सुरंगापाणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.