वेंगुर्ला : रेडी विठोबा-रखुमाई मंदिरात २१ पासून हरिनाम सप्ताह

शेअर करा

वेंगुर्ला,दि.१८ जुलै

रेडी येथील श्री विठोबा रखुमाई मंदिरात २१ ते २८ जुलै या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जाणार आहे. यानिमित्त मंदिरात कार्यक्रम होणार आहेत. दि.२८ जुलै रोजी गोपाळकाला व पालखी प्रदक्षिणा तसेच समुद्रात श्रीफळ अर्पण करून या सप्ताहाची सांगता होणार आहे. तरी भाविकांनी या सप्ताहास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा