वेंगुर्ला,दि.०५ सप्टेंबर
नगर वाचनालय, वेंगुर्ला या संस्थेतर्फे देण्यात येणारे आदर्श शिक्षक, शिक्षिका आणि आदर्श शाळा पुस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षी यात आदर्श शिक्षक पुरस्कार (माध्यमिक) म्हणून शिरोडा येथील अ.वि.बावडेकर विद्यालयाचे डॉ.श्रीराम दिक्षित, आदर्श शिक्षिकाम्हणून आसोली शाळा नं.१ च्या वैभवी रायशिरोडकर यांचा तसेच आदर्श शाळा म्हणून श्री नारायण विद्यामंदिर आसोली नं.१ या प्राथमिक शाळेचा समावेश आहे.
या पुरस्कारांचे वितरण २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वा. नगर वाचनालयाच्या सभागृहात करण्यात येणार आहे. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.