आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न
वेंगुर्ले ,दि.२० सप्टेंबर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्गातील वेंगुर्ले आगारास आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून प्राप्त झालेल्या 5 राजमाता जिजाऊ बसेस चा लोकार्पण सोहळा आमदार तथा माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पूजन व पुष्पहार घालून संपन्न झाला.
वेंगुर्ले तालुक्यातील तळागाळातील ग्रामीण भागातील प्रवासी वर्गाला दर्जेदार प्रवासी सेवा मिळावी या उद्देशाने सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून वेंगुर्ले आगारास पाच राजमाता जिजाऊ बसेस प्राप्त झाल्या होत्या. या बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते बसेसचे पूजन करून व पुष्पहार घालून लोकार्पण झाले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांत वेंगुर्ले नगराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष दिलीप गिरप, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, उपसभापती सचिन देसाई, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न देसाई, वेंगुर्ले आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे, तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, वेंगुर्ला उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख बाळा दळवी, शहर प्रमुख अजित राऊळ, शिवसेनेचे युवक जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, कोचरा सरपंच योगेश तेली, माजी सभापती सुनील मोरजकर, सत्यवान साटेलकर, मितेश परब, दत्ता साळगावकर, कौशिक मोरजे, संजय परब, मनीष रेवणकर, संतोष परब, उमेश नाईक, अशोक वेंगुर्लेकर, गणपत केळुसकर, प्रकाश मोठे, पंकज शिरसाट, नगरसेविका लिना म्हापणकर, समिधा रेडकर, तसेच वेंगुर्ला आगारातील अधिकारी, कर्मचारी व प्रवासी वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.