वेंगुर्ला : पंतप्रधानांच्या यशस्वी वाटचालीनिमित्त महाआरती संपन्न

शेअर करा


वेंगुर्ला,दि. १२ जून (प्रथमेश गुरव )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या यशस्वी वाटचालीनिमित्त वेंगुर्ला येथील चांदेरकर यांच्या विठ्ठल मंदिरात गुरूवारी एकादशी दिवशी रात्री महाआरती करण्यात आली. तर ह.भ.प.सावळारामबुवा कुर्ले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला.


नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर कार्य करून एक नवा विक्रम स्थापित केला आहे. पंतप्रधान मोदी यांचे केंद्र सरकार हे सनातनी धर्माचे पुरस्कर्ते असल्याने 500 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राम मंदिराची उभारणी झाली. जगाच्या नकाशावर भारताचे विकसनशील स्थान अधोरेखित केले आहे. ह्रा एका तपामध्ये मोदींनी राष्ट्र प्रगतीपथावर नेले. हिंदूस्थान परम वैभवशाली बनविण्यासाठी पंतप्रधान मोदी दिवसरात्र मेहनत घेत असल्याचे नगरसेवक सुषमा प्रभूखानोलकर यांनी यावेळी सांगितले.


या महाआरती प्रसंगी नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, मंडल अध्यक्ष पपू परब, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल व दादा केळुसकर, नगरसेवक प्रणव वायंगणकर, सचिन शेटये, प्रशांत आपटे, रविंद्र शिरसाठ, सदानंद गिरप, विनय मोेर्डेकर, आकांक्षा परब, रिया केरकर, काजल कुबल, गौरी माईणकर, महिला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर, माजी उपनगराध्यक्ष अभि वेंगुर्लेकर, ओबीसी सेलचे शरद मेस्त्री यांसह भाजपाचे विनय गोगटे, नाना महाजन, किरण मेस्त्री तसचे वारकरी संप्रदायाचे किशोर रेवणकर, गजानन कुबल, दिलीप कुर्ले, सुभाष कुर्ले, रामकृष्ण डिचोलकर, सहदेव गिरप, अंकुश वराडकर, गोपीनाथ म्हाकले, महानंदा मयेकर, गौतमी कुबल, लता खोबरेकर, दुर्गा कुबल, जोत्स्ना कुबल, महेंद्र पालव, संजय गिरप आणि कुबल सर उपस्थित होते.

शेअर करा