वेंगुर्ला: आनंदवाडीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

शेअर करा

वेंगुर्ला,दि.१८ जुलै

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या दहावी, बारावी आणि पदवीधर तसेच उच्च पदवीधर विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई-शाखा वेंगुर्ला, दलित समाजसेवा मंडळ-वेंगुर्ला आणि सावित्रीबाई महिला मंडळ-वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने हा सत्कार कार्यक्रम आनंदवाडी येथील डॉ.आंबेडकर सभागृहात संपन्न झाला.
सत्कारमूर्तींमध्ये सोहम जाधव, नेहाल जाधव, प्रभोत जाधव, प्रशित जाधव (दहावी उत्तीर्ण), प्रज्वल जाधव, प्रज्योत कदम, केतकी जाधव (बारावी उत्तीर्ण), सौ.विश्वश्री जाधव, सौ.प्रांजल जाधव, करिना जाधव (पदवीधर), तनिष जाधवप, सुजल जाधव, साहिल जाधव (उच्च पदवीधर) आदींचा समावेश आहे. दरम्यान, विश्वश्री वासुदेव जाधव आणि प्रांजल प्रदिप जाधव यांनी आपली नोकरी आणि घर संभाळून पदवीधरचे शिक्षण पूर्ण केले. यासाठी त्यांना विशेष पाठींबा देणारे त्यांचे पती वासुदेव जाधव व प्रदिप जाधव यांचाही सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाप्रसंगी मठ हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनिल जाधव, दलित सेवा समाज मंडळाचे अध्यक्ष सुहास जाधव, सचिव गौतम जाधव, सखाराम जाधव, सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघाचे वेंगुर्ला अध्यक्ष प्रेमानंद जाधव, उपाध्यक्ष गजानन जाधव, सचिव जयंत जाधव, कार्याध्यक्ष विठ्ठल जाधव, सावित्रीबाई फुले मंडळाच्या अध्यक्षा सुहानी जाधव, उपाध्यक्ष गीतांजली जाधव, गंगाराम जाधव, महेंद्र जाधव, सत्यवान जाधव, राजन जाधव, आर.एन.जाधव, प्रदिप जाधव, वासुदेव जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन जाधव, वाय.जी.कदम आदी उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णदर्शन जाधव यांनी केले. तर गौतम जाधव यांनी आभार मानले.

शेअर करा